आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 नोव्हेंबरपर्यंत खाऊ नका हे पदार्थ, लक्ष्मी कृपेसाठी लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचानागानुसार सोमवार 27 जुलैपासून रविवार 22 नोव्हेंबर 2015 पर्यंत चातुर्मास राहील. हा चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. या दिवसांमध्ये गुळ, तेल, दही, तांदूळ, मुळा, वांगे, हिरव्या भाज्या खाऊ नयेत. प्राचीन मान्यतेनुसार चातुर्मासात आहारात आणि राहणीमानात बदल करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी या काळात भगवान विष्णू यांचा मंत्राचा जप करावा.

मंत्र -
ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।।

देवशयनी एकादशी सोमवार 27 जुलैपासून पुढील चार महिने भगवान विष्णू झोपतात. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो. यानंतर पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ओळखले जाते. चातुर्मासामध्ये लोक मंदिर-आश्रमामध्ये कथा श्रवण तसेच भजन-कीर्तन करतात. लग्न व मंगलकार्याच्या शुभ मुहूर्तासाठी पुढील चार महिने वाट पाहावी लागणार आहे.

पुढे जाणून घ्या, या चार महिन्यात लग्नकार्य का केले जात नाहीत आणि आहारात का करावा बदल...