हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. या काळात अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळातच ही विविध व्रते का असावीत, यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत. या वर्षी चातुर्मासाला 27 जुलै, सोमवारपासून सुरुवात होत आहे.
भारतीय संस्कृतीचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. कदाचित याच कारणामुळे ज्या नक्षत्रांमध्ये पूर्ण चंद्र (पौर्णिमेचा चंद्र) येतो, त्याच नक्षत्रांवर वर्षभरातील विविध महिन्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. भारतीय संस्कृतीतील विविध सोहळे, उत्सव, व्रतवैकल्ये, सण-वारदेखील निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीच साजरे केले जातात. आषाढाच्या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो. याला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या महिन्यात लपलेल्या रहस्यांचा अभ्यास केल्यास जीवन आणखी आनंददायी करता येऊ शकते.
चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत...
1. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दही, तूप, गोमुत्र) सेवन करावे.
2. पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एक भुक्त (एकदाच जेवण), आयाचित (न मागितलेले) जेवण किंवा उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे.
3. तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये.
4. चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये.
5. पलंगावर झोपू नये, पत्नीसोबत सहवास करू नये, मांस खाऊ नये, मध, गुळ, हिरव्या भाज्या, मुळा, वांगे हे पदार्थही खाऊ नयेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि याचे महत्त्व...