आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhatrapati Shivaji Maharaj Inspiration Temple In Srisailam

छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीमंदिर; कधीकाळी शिवरायांचे येथे होते वास्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज दि. 19 फेब्रुवारी रोजी आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल घेत आंध्र प्रदेश व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे श्रीशैलम येथे शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिराची उभारणी केली आहे. जयंती निमित्त आज आम्‍ही तुम्‍हाला शिवयांच्‍या स्‍फूर्तीमंदिराविषयी माहिती देणार आहोत...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची श्री शंभू महादेव आणि श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा होती. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम‌् येथे दुसरे जोतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन आणि अठरा शक्तिपीठांपैकी श्री भ्रमरांभादेवी मातेची साधना करण्यासाठी छत्रपती सन 1647-77 दरम्यान वास्तव्यास होते. त्यांनी बांधलेल्या ध्यानमंदिराच्या पडझडीनंतर त्या ठिकाणी श्री शिवाजी स्मारक समितीने शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर उभारले आहे, अशी माहिती समितीचे संघटनमंत्री एस. नागेश्वर राव यांनी दिली. कुतुबशहाने केलेला सत्कार स्वीकारून शिवछत्रपती गोवळकोंड्याहून सैन्यासह दक्षिणेकडे निघाले. प्रथम श्रीशैलम‌्च्या मल्लिकार्जुन श्री भ्रमरांभादेवी मातेची त्यांनी आराधना केली. आंध्र प्रदेशातील लोकपरंपरा असे मानते की, श्री भ्रमरांभा देवी मातेने शिवरायांना भवानी तलवार दिली. तसे शिल्पही परिसरात आढळते.
पुढील स्‍लाईडवर वाचा, शिवरायां मिळाला कैलास दर्शनाचा परमानंद...