आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासरी अध्यात्माचे जग निर्माण करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रिया आपल्या जीवनात पुरुषांच्या तुलनेत वेगळ्या परिस्थितीतून जातात. विशेष म्हणजे जेव्हा मी कथा सांगतो त्या वेळी अनेक स्त्रिया भेटतात. विवाहानंतरचे आमचे जीवन आम्हाला वाटले तसे नाही आणि त्यामुळे आपण खुश नाही किंवा निराशावस्थेत आहोत, असे त्या सांगतात. त्याचे निदान दुसऱ्या व्यक्तीकडून मिळू शकत नाही, कारण स्त्रियांना जीवनात एकदा प्लॅटफॉर्म बदलावा लागतो, पुरुष त्यापासून मुक्त आहे. माहेरपासून सासरपर्यंतचा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी खूप कठीण आणि आव्हानात्मक आहे. माहेर भूतकाळ आहे, तेथे पालनपोषणात लाड-प्रेमामुळे काही कमकुवत बाजूंकडे दुर्लक्ष होते. समजदार आई-वडिलांनी समजावले तरीही थोडे सबुरीनेच. भविष्यात मुलीला याची किंमत चुकवावी लागू शकते, याकडे ते दुर्लक्ष करतात. सासरच्या जीवनात तिला आक्रमकता, स्पष्टपणा, परकेपण आणि शोषण दिसू लागते. कारण तेथे आई-वडिलांसारखे कोणीही समजावून सांगणार नाही. त्या मुलीला वाटते की, सासरचे लोक प्रेम नव्हे, तर दिखाऊपणा करतात. असे होऊही शकते आणि नाहीही. सासू-सासऱ्यांनी आई-वडील व्हावे, सुनेला मुलगी समजावे, असे कितीही ओरडून सांगितले तरी जे व्हायचे तेच होते.

माहेर आणि सासरदरम्यानचा प्रवास सुखाचा करायचा असेल तर नवे जग निर्माण करावे लागेल, ते म्हणजे अध्यात्माचे जग. घर चालवताना कोणत्याही स्त्रीसाठी योगाचा मोठा परिणाम असेल आत्मबल आणि आंतरिक प्रसन्नता. ही ताकद तिला स्वत:च मिळवावी लागेल. तुमच्यासाठी कोणी बदलणार नाही, पण तुम्ही बदललात तर मग त्या योगाच्या कक्षेत येऊन इतरही कदाचित तुम्हाला जसे हवेत तसेच होतील.
पं. विजयशंकर मेहता
बातम्या आणखी आहेत...