शास्त्रानुसार सकाळी स्नान करणे हा एक असा सोपा उपाय आहे, ज्यामुळे शरीरासोबत मनही पवित्र होते. यामुळे मनुष्य मानसिक आणि वैचारिक रुपात मजबूत आणि पवित्र होऊन सहजतेने मनासारखे यश प्राप्त करून वैभवशाली जीवन जगू शकतो.
अशाच प्रकारे गुण आणि धन संपन्न होण्यासाठी शास्त्रामध्ये सकाळी स्नान करताना पवित्रतेचे प्रतिक असलेल्या गंगेच्या विशेष मंत्र स्मरणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. शास्त्रानुसार या मंत्रामुळे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाचे स्मरण होते. कारण कोणत्या न कोणत्या स्वरुपात गंगा तिन्ही देवतांना प्रिय आहे. जाणून घ्या, हा मंगलकारी स्नान मंत्र ज्याच्या स्मरणाने दिवसभर शुभफळ प्राप्त होतात असे मानले जाते.
ह्मकुण्डली, विष्णुपादोदकी, जटाशंकरी, भागीरथी, जाह्नवी।
किंवा खालील मंत्राचे स्मरण करावे
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।