रविवार, 22 नोव्हेंबर 2015 ला देवउठनी म्हजेच देव प्रबोधिनी एकादशी आहे. या तिथीला भगवान विष्णू आणि महालक्ष्मीसोबत तुळशीची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवउठनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी झोपेतून जागे होतात. ही देवांच्या उठण्याची तिथी असल्यामुळे याला देवउठनी एकादशी म्हणतात. ज्या लोकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल त्यांनी या दिवशी विष्णू आणि महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय करावेत. येथे जाणून घ्या, 22 नोव्हेंबरला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.