आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devotthan Ekadashi Do Lord Vishnus Worship By This Method

देवउठनी एकादशी उद्या, या विधीने करा भगवान विष्णुंची पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवप्रबोधनी एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार देवप्रबोधनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. यालाच देवोत्थापनी किंवा देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या विशेष पूजेचे महत्त्व आहे. यावर्षी देवप्रबोधिनी एकादशी 22 नोव्हेंबर, रविवारी आहे. देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची अशाप्रकारे पूजा करावी...

पूजन विधी
हिंदू शास्त्रानुसार कार्तिक शुक्ल एकादशीला विशेष पूजा, व्रत-उपवास केले जातात. या तिथीला रात्री जागरणही केले जाते. देवप्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णूला धूप, दीप, नैवेद्य, फुल, गंध, फळ इ. अर्पण करावे. भगवान विष्णूची पूजा करून घंटा, शंख, मृदंग इ, वाद्यांसोबत खालील मंत्राचा उच्चार करावा...

उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते।
त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेदिदम्।।
उत्तिष्ठोत्तिष्ठ वाराह दंष्ट्रोद्धृतवसुंधरे।
हिरण्याक्षप्राणघातिन् त्रैलोक्ये मंगलं कुरु।।

त्यानंतर भगवान विष्णूची आरती करून पुष्पांजली अर्पण करताना खालील मंत्राने प्रार्थना करावी...

इयं तु द्वादशी देव प्रबोधाय विनिर्मिता।
त्वयैव सर्वलोकानां हितार्थं शेषशायिना।।
इदं व्रतं मया देव कृतं प्रीत्यै तव प्रभो।
न्यूनं संपूर्णतां यातु त्वत्वप्रसादाज्जनार्दन।।

त्यानंतर प्रल्हाद, नारदमुनी, परशुराम, पुंडलिक, व्यास, शुक, शौनक आणि भीष्म इ. भक्तांचे स्मरण करून चरणामृत (तीर्थ) आणि प्रसाद वाटावा.

देवउठनी एकादशीची व्रत कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...