आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशी आज : जाणून घ्या, पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या वर्षी हा सण 28 ऑक्टोबर, शुक्रवारी आहे. या सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते.

असे प्रकट झाले होते भगवान धन्वंतरी
प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले, तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधींचे पूजन केले जाते. पुराणांमध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अंशावतार मानले गेले आहे.

पूजन विधी :
सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. भगवान धन्वंतरी यांची मूर्ती किंवा प्रतिमा पवित्र ठिकाणी स्थापन करून स्वतः पूर्व दिशेला मुख करून बसा. त्यानंतर भगवान धन्वंतरीचे खालील मंत्राचे स्मरण करून आवाहन करावे...

सत्यं च येन निरतं रोगं विधूतं,
अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।
गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।

त्यानंतर आचमन करून भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेवर गंध, अक्षता, फुल, गुलाल अर्पण करावा. चांदीच्या भांड्यात खीर नैवेद्य दाखवावी. (चांदीचे भांडे उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही भांड्याचा उपयोग करू शकता). यानंतर पुन्हा आचमन करा. मुख शुद्धीसाठी विड्याच्या पानाचा एक विडा लावून ठेवा. शंखपुष्पी, तुळस, ब्राह्मी इ. पूजनीय औषधी भगवान धन्वंतरीला अर्पण करा.

रोग नाशच्या इच्छेने खालील मंत्राचे स्मरण करा

ऊं रं रूद्र रोग नाशाय धन्वन्तर्ये फट्।।

यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घर, ऑफिस, फॅक्ट्री कारखान्यात पूजेसाठीचे खास मुहूर्त...
बातम्या आणखी आहेत...