आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी संध्याकाळी येथे लावा 1 दिवा, अकाल मृत्युपासुन रक्षण होईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कंद पुराणानुसार अश्विन मासातील कृष्णपक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी (यावर्षी 17, ऑक्टोबर, मंगळवार)च्या दिवशी प्रदोष काळा (संध्या)त यमादेवाला दीप आणि नैवेद्य समर्पित केल्यास अकाल मृत्यूचे भय राहत नाही. यम दीपदान प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी करावे. तसेच दिवाळीच्या उत्सवातील धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य धन्वंतरीचे पूजन केले जाते. कुटुंबातील मित्र परिवारातील सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.

या दिवशी कणकेचा दिवा करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल या पद्धतीने तो दिवा ठेवून,

मृत्यूनापाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह।
त्रयोदश्यां दीपदानात सूर्यज: प्रीयतां मम ।।

हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा.

यानंतर हातामध्ये फुल घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत यमदेवाच्या दक्षिण दिशेला नमस्कार करावा -
ऊं यमदेवाय नम:। नमस्कारं समर्पयामि।।

त्यानंतर हे फुल दिव्याजवळ ठेवावे आणि हातामध्ये बताशा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत बताशा दिव्याजवळ ठेवावा
ऊं यमदेवाय नम:। नैवेद्यं निवेदयामि।।

त्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आचमन करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करत दिव्याजवळ पाणी सोडा -
ऊं यमदेवाय नम:। आचमनार्थे जलं समर्पयामि।

त्यानंतर पुन्हा ऊं यमदेवाय नम: मंत्राचा उच्चार करत दक्षिण दिशेला नमस्कार करा.

धनत्रयोशीला दिपदान का करतात या मागील कथा जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...