आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जे पुरुष स्त्रीबद्दल असा विचार करतात, त्यांना शास्त्रात पापी मानण्यात आले आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराणामध्ये व्यावहारिक जीवनातील विविध वाईट काम आणि विचारांना पाप मानण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मनात हे विचार आणि शरीराला लागलेल्या सवयी स्वभावात अशाप्रकारे मिसळलेल्या असतात की यांना वारंवार सांगून देखील चुकीची जाणीव होत नाही.

धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास कोणताच व्यक्ती पाप करण्यापासून सुटलेला नाही, प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या रुपात एखादे पाप अवश्य करतो. काही लोक नकळतपणे तर काही जाणूनबुजून पाप करतात, परंतु पापाचे परिणाम हे भोगावेच लागतात. आज आम्ही तुम्हाला स्त्रीशी संबंधित काही अशा गोष्टी सांगत आहोत, ज्यांना गरुड पुराणामध्ये पाप आणि यांना करणाऱ्या व्कातीला पापी मानण्यात आले आहे...

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
मातरं भगिनीं ये च विष्णुस्मरणवर्जिता:। अदृष्दोषां त्यजति स प्रेतो जायते ध्रुवम्।
भ्रातृधुग्ब्रह्महा गोघ्र: सुरापो गुरुतल्पग:। हेमक्षौमहरस्ताक्ष्र्य स वै प्रेतत्वमाप्रुयात्।।
न्यासापहर्ता मित्रधु्रक् परदारतस्तथा। विश्वासघाती क्रूरस्तु स प्रेतो जायते ध्रुवम्।।
कुलमार्गांश्चसंत्यज्य परधर्मतस्तथा। विद्यावृत्तविहीनश्च स प्रेतो जायते ध्रुवम्।।

या श्लोकाचा अर्थ सोप्या शब्दामध्ये सांगायचा झाल्यास...

- निरपराध आई, बहिण पत्नी, सून आणि मुलीला छेडणे.
- गुरुपत्नीच्या प्रती दुर्भाव मनामध्ये ठेवणारा, भावासोबत धोका करणारा, गाईची हत्या करणारा, नशा करणारा, एखाद्या मनुष्य किंवा ब्राह्मणाला मृत्युतुल्य दु:ख देणारा आणि चोर.
- परस्त्रीशी संबंध ठेवणारा, घरातील वस्तुंची चोरी करणारा, मित्राला धोका देणारा, विश्वासघातकी आणि दुष्ट.
- अज्ञानी, दुराचरण करणारा, कुटुंब आणि धर्म परंपरेचा मार्ग सोडून चालणारा. या सर्वांना प्रेत योनीमध्ये जावे लागते.

पुढील स्लाइड्समध्ये वाचा, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडते...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)