आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही स्नानात व्हीआयपींनी जाणे टाळायला हवे, एमपीच्‍या मुख्यमंत्र्यांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवराजसिंह चौहान - Divya Marathi
शिवराजसिंह चौहान
भोपाळ - सिंहस्थानंतर उज्जैनला जपानच्या क्योटो शहराच्या धर्तीवर विकसित केले जाईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले. पहिल्या शाही स्नानाच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. मंदिरांचे शहर म्हणून क्योटो जगभरात आेळखले जाते. उज्जैनदेखील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या तितकेच समृद्ध आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्याशी झालेली ही बातचीत..
> प्रश्न : सिंहस्थासारख्या मोठ्या आयोजनामध्ये व्हीआयपींच्या भेटी अडथळे ठरू लागतात?
> मुख्यमंत्री : आम्ही भाविकांच्या संख्येचा अंदाज लावला आहे. शुक्रवारी ही संख्या कमी राहिली तरी नंतरच्या शाही स्नानासाठी किमान एक कोटी लोक येणे अपेक्षित आहे. म्हणूनच व्हीआयपींनी पर्वणीत सहभागी होण्यासाठी येऊ नये. जरी कोणी आले तरी त्याला सामान्य भाविकाप्रमाणेच स्नान करावे लागेल. मी गेलो तरी सामान्य नागरिकासारखाच जाईन.
> प्रश्न : सिंहस्थाच्या निमित्ताने वैचारिक महाकुंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु मग पूर्वीचा अनुभव पाहता त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही का?
> मुख्यमंत्री : वैचारिक महाकुंभात कृषी कुंभ, शक्ती कुंभ, स्वच्छतेसह इतर विषयांवर चर्चा होईल. मध्य प्रदेश सरकार तो यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल. परंतु देश-विदेशातील विद्वानांच्या चर्चेतून जगभरात चांगला संदेश जाईल. या वैचारिक कार्यक्रमात नेपाळ, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे प्रमुख मोहन भागवत त्याचे उद््घाटन करतील आणि समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल.
> प्रश्न : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा लागू करण्याचा हा प्रयत्न आहे का?
> मुख्यमंत्री : अजिबात नाही. सिंहस्थात साधू-संत सद्य:परिस्थितीतील प्रश्नांवर विचारविनिमय करतील. त्यासाठीच ते उज्जैनमध्ये दाखल झाले आहेत.
> प्रश्न : राममंदिरावर त्यात चर्चा होईल का?
> मुख्यमंत्री : नाही. वैचारिक महाकुंभात पूर्वी स्पष्ट करण्यात आलेल्या विषयांवरच चर्चा होईल.
> प्रश्न : क्षिप्रा नदीसाठी सिंहस्थानंतर काही योजना आहे ? उज्जैनचा चेहरामोहरा कसा बदलणार ?
> मुख्यमंत्री : नर्मदेचे पाणी सातत्याने क्षिप्रा नदीला मिळत राहील. सध्या या सिंहस्थाची संकल्पना ग्रीन सिंहस्थ म्हणून राबवण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने क्षिप्रा नदीच्या दोन्ही किनारी वृक्षारोपण करण्यात येत आहे. सिंहस्थानंतरही उज्जैनला सांस्कृतिक नगरी म्हणून आेळख देण्यासाठी काम केले जाईल. या शहराला जपानच्या क्योटो शहराच्या धर्तीवर विकसित करण्याचा संकल्प आहे. एकूणच शहराला नवीन आेळख मिळू शकेल.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सिंहस्थ: साध्वीनेही मारली डुबकी, संत-महंतांनी केले शाही स्नान