आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का, दिवाळीच्या पाचही दिवसांचे महत्त्व आणि रोचक कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण दीपावली. गुरुवार (ता. 27) वसुबारस, शुक्रवार धन्वंतरी जयंती असून, शनिवारी नरक चतुर्दशी आहे. हाच दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिले अभ्यंगस्नान. तिथून तीन दिवसांची दिवाळीच दिवाळी.. गोडधोड खाण्याची. येथे जाणून घ्या, दिवाळीच्या पाच दिवसांचे धार्मिक महत्त्व.

धनत्रयोदशी
अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशीच घरातील सर्वजण विषेत: स्त्रिया तेल, उटणे लावून डोक्यावरून अंघोळ करतात. या दिवशी शुचिभरूत होऊन दिवाळीस प्रारंभ होतो. सायंकाळी घराजवळील परिसर झाडून, सडा मारून नवीन वस्त्रे परिधान करून लक्ष्मीची पूजा केली जाते. व्यापारी लोक चोपडा पूजन करतात तसेच घरातील अवजारे हत्यारे ,सोने, नाणे यांचीही पूजा करतात. धणे व गुळाचा नैवेद्य दाखविला जातो. धनत्रयोदशीपासून तेलाचे दिवे लावतात. घरासमोर आकाश कंदील लावतात. जो दिवाळीचे पाच दिवस दिवे लावतो त्याला अकाली मरण येणार नाही, असे यमराजांनी सांगितले. धनत्रयोदशीला आयुर्वेदाचा जनक धन्वंतरीचा जन्म झाला. या धन्वंतरीने आपल्याला आणि संपूर्ण जीवसृष्टीला आयुर्वेद दिला. मानवाचे जीवन आरोग्यदायी बनवले. म्हणून या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातले लोक धन्वंतरीची पूजा करतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दिवाळीच्या पाच दिवसांचे धार्मिक महत्त्व...
बातम्या आणखी आहेत...