आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरक चतुर्दशी : या विधीने करा यम तर्पण, हे आहेत शुभ मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या वर्षी हा सण 28 ऑक्टोबर, शुक्रवारी आहे. या दिवशी यमदेवाची पूजा करण्याचे विधान आहे. नरक चतुर्दशीला या विधीनुसार यम तर्पण करावे -

पूजन विधी
या दिवशी शरीरावर तेल लावून मालिश करून सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे विधान आहे. स्नान करताना अपमार्ग (आघाडा) चा स्पर्श शरीराला करावा. खालील मंत्राचा उच्चार करून अपमार्ग डोक्यावरून फिरवावे -

सितालोष्ठसमायुक्तं सकण्टकदलान्वितम्।
हर पापमपामार्ग भ्राम्यमाण: पुन: पुन:।।

स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून, टिळा लावून दक्षिण दिशेला मुख करून खालील मंत्राचा उच्चार करून तुलने तीन-तीन वेळेस जल अर्पण करावे. यालाच यम तर्पण म्हणतात. या उपायाने वर्षभरातील पाप नष्ट होतात.

ऊं यमाय नम:, ऊं धर्मराजाय नम:, ऊं मृत्यवे नम:, ऊं अन्तकाय नम:, ऊं वैवस्वताय नम:, ऊं कालाय नम:, ऊं सर्वभूतक्षयाय नम:, ऊं औदुम्बराय नम:, ऊं दध्राय नम:, ऊं नीलाय नम:, ऊं परमेष्ठिने नम:, ऊं वृकोदराय नम:, ऊं चित्राय नम:, ऊं चित्रगुप्ताय नम:।

हे तर्पण कर्म सर्व पुरुषांनी करावे. त्यानंतर देवतांचे पूजन करून संध्याकाळी दीपदान करावे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचीसुद्धा पूजा करावी, कारण या दिवशी त्यांनी नरकासुरचा वध केला होता. या दिवशी जो व्यक्ती श्रीकृष्णाची विधिव्रत पूजा करतो त्याचे सर्व पाप दूर होतात आणि त्याला वैकुंठात स्थान मिळते.

शुभ मुहूर्त
सकाळी 05 पासून 06:27 पर्यंत (अभ्यंग स्नानासाठी)
संध्याकळी 05:40 पासून 06:55 पर्यंत (दिपदानासाठी)

नरक चतुर्दशीची कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...