Home | Jeevan Mantra | Dharm | Diwali 2017 Know The Importance Of Goddess Lakshmi

दिवाळी 19 ला : या ग्रंथांमध्ये लिहिले आहे देवी लक्ष्मीचे महत्त्व

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 10, 2017, 02:00 PM IST

या वर्षी अश्विन-कार्तिक अमावस्या तिथीला (19 ऑक्टोबर, गुरुवार) दिवाळीचा सण साजरा केला जाईल

 • Diwali 2017 Know The Importance Of Goddess Lakshmi
  या वर्षी अश्विन-कार्तिक अमावस्या तिथीला (19 ऑक्टोबर, गुरुवार) दिवाळीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी मुख्यतः देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते म्हणजेच देवीच्या कृपेने मनुष्याला भौतिक सुख-सुविधांची प्राप्ती होते. विविध पौराणिक ग्रंथामध्ये देवी लक्ष्मी संदर्भात वर्णन करण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, कोत्न्या ग्रंथामध्ये देवी लक्ष्मी संदर्भात काय संग्यात आले आहे...

  - महाभारताचे रचिता महर्षी वेदव्यास लिहितात की - पुरुषां धनं वध: अर्थात लक्ष्मीचा अभाव तर मनुष्यासाठी मृत्यूचे चिन्ह आहे. जर मनुष्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त झाली नाही तर इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही.

  - ऋग्वेदातील श्री सुक्तमध्ये भगवती देवीला प्रार्थना करण्यात आली आहे की - 'हे देवी, मी तुमचे वरण करतो. तुम्ही दरिद्रता, अलक्ष्मीचा नाश करून माझ्या घरातील असमृद्धीला दूर करा.

  इतर ग्रंथांमध्ये देवी लक्ष्मीच्या संदर्भात काय सांगण्यात आले आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 • Diwali 2017 Know The Importance Of Goddess Lakshmi
  - भर्तृहरी संहितामध्ये सांगण्यात आले आहे की, ज्याच्याजवळ लक्ष्मी (धन) आहे, तोच कुलीन, पंडित, गुणी, श्रेष्ठ आणि दर्शनीय आहे. याचा अर्थ हे सर्व गुण लक्ष्मीचे आश्रित आहेत. लक्ष्मी कृपा प्राप्त केल्यानंतरच या सर्व सुखांची पूर्ती शक्य आहे. केवळ मनुष्यालाच नाही तर देवतांनाही आपले देवत्व कार्य पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीची उपासना करावी लागते.
 • Diwali 2017 Know The Importance Of Goddess Lakshmi
  - श्री ब्रह्मपुराणमध्ये उल्लेख आहे की, दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवरील घराघरात भ्रमण करते. यामुळे लक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्वजण आपापल्या घराला सर्वप्रकारे स्वच्छ, शुद्ध आणि सुंदर पद्धतीने सजवतात, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये निवास करू शकेल.

Trending