आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विधीनुसार करा गणेश मूर्तीचे विसर्जन, हे आहेत मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी (15 सप्टेंबर, गुरुवार) साजरी केली जाते. या दिवशी 10 दिवसीय गणेशोत्सवाचे समापन होते आणि घरामध्ये स्थापित गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. शास्त्रोक्त मान्यतेनुसार स्थापित मूर्तीचे विसर्जन करणे आवश्यक आहे, मग हे विसर्जन नदी किंवा तलावामध्येच करणे गरजेचे नाही परंतु विसर्जन पाण्यातच करावे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे एक स्वच्छ भांडे घ्या, शुद्ध पाण्याने ते भरा व विसर्जन करा. विरघळलेली माती, तुळस किंवा इतर कोणत्याही रोपट्याच्या आळय़ात टाका. रोपट्याच्या रूपात श्रींचा घरात कायम वास राहील. विसर्जन करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे आवश्यक आहे.

पूजन विधी
विसर्जनापूर्वी स्थापित गणेश मूर्तीचा संकल्प मंत्र घेऊन गणेशाची पंचोपचार पूजा करावी. गणेशाच्या मूर्तीवर अक्षता, गुलाल, लाल फुल, दुर्वा इ. पूजन सामग्री अर्पण करावी. श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...

ऊँ गं गणपतये नम:

गणपतीला दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ गणाधिपतयै नम:
ऊँ उमापुत्राय नम:
ऊँ विघ्ननाशनाय नम:
ऊँ विनायकाय नम:
ऊँ ईशपुत्राय नम:
ऊँ सर्वसिद्धप्रदाय नम:
ऊँ एकदन्ताय नम:
ऊँ इभवक्त्राय नम:
ऊँ मूषकवाहनाय नम:
ऊँ कुमारगुरवे नम:

त्यानंतर श्रीगणेशाची आरती करून घरातच गणेश मूर्तीचे विसर्जन करून खालील मंत्राचा उच्चार करावा

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम् ।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

थोड्यावेळाने हे पवित्र पाणी घरातील झाडांना टाकावे. अशाप्रकारे गणेश विसर्जन केल्यास गणेशाची कृपा कुटुंबावर राहील.

विसर्जनाचे शुभ मुहूर्त
सकाळी 06:20 ते 07:50 पर्यंत
दुपारी 01:50 ते 03:20 पर्यंत
संध्याकाळी 04:50 ते 6:15 पर्यंत

पुढे वाचा, गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच का करावे...
बातम्या आणखी आहेत...