आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी करा देवी महागौरीची पूजा, मनाला मिळेल शांती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. आदिशक्ती दुर्गाचे अष्टम रूप श्री महागौरी आहे. ही देवी श्वेत वस्त्रे व आभूषणे धारण करते. त्यामुळे या देवीला महागौरी म्हणतात. या देवीची आयुर्मर्यादा आठ वर्षे मानली जाते. या चतुभरुज देवीच्या उजव्या एका हाताची वरमुद्रा व दुसर्‍या हातात त्रिशूळ आहे. एका डाव्या हातात डमरू व दुसरा हाच अभयमुद्रेत आहे. देवीचे वाहन वृषभ (बैल) आहे. या देवीच्या उपासनेने सर्व प्रकारचे शीघ्र फळ मिळते, पूर्वजन्मीच्या संचित पापांचा विनाश होऊन मनोरथ सिद्ध होतात.

पूजन विधी -
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर महागौरी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रह, षोडश मातृका (16 देवी) ची स्थापना करावी. त्यानंतर व्रत, पूजांचा संकल्प घ्यावा.

वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून महागौरीसहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने, फुलं-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इ. गोष्टी कराव्यात.

ध्यान मंत्र
श्वेत वृषे समारूढ़ा श्वेताम्बरधरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥

देवी महागौरीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...