आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Worship Of Goddess Saraswati By This Method On Vasant Panchami

आज वसंत पंचमीला असे करावे देवी सरस्वतीचे पूजन, हे आहेत शुभ मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (24 जानेवारी, शनिवार) वसंत पंचमी आहे. धर्म शास्त्रानुसार या दिवशी देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. देवी सरस्वतीला विद्या, बुद्धी, ज्ञान, संगीत आणि कलेची देवी मानले जाते. व्यावहारिक रुपात विद्या आणि बुद्धी व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक आहे.

शास्त्रानुसार विद्येमुळे विनम्रता, विनम्रतेने पात्रता, पात्रतेने धन आणि धनाने सुख मिळते. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिव्रत पूजा केल्यास विद्या आणि बुद्धीसोबत निश्चित यश मिळते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा पुढील प्रमाणे करावी...

पूजन विधी
- सकाळी स्नान करून पवित्र आचरण, वाणी संकल्पाने सरस्वतीची पूजा करा.

- पूजेमध्ये गंध, अक्षतासोबत विशेषतः पांढरे आणि पिवळे फुल, पांढरे चंदन, पांढरे वस्त्र सरस्वतीला अर्पण करावेत.

- नैवेद्यामध्ये पिवळे तांदूळ, खीर, दुध, तिळाचे लाडू, तूप, नारळ असावे.

- त्यानंतर देवी सरस्वतीची आरती करावी

देवी सरस्वतीची आरती आणि पूजन मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करावे...