आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रावण वधानंतर काय केले होते मंदोदरीने, तुम्‍हाला माहिती आहे का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदोदरीची ओळख फक्‍त रावणची पत्‍नी एवढ्यापूरतीच मर्यादित आहे. जसे काही रावणाच्‍या मृत्‍यूनंतर तिचाही अध्‍याय संपूष्‍टात आला. पौराणिक ग्रंथामध्‍येही मंदोदरीबद्दल फार कमी लिहिले गेले आहे. असे असले तरीही तिच्‍याबद्दल अनेक मौखिक कथा प्रसिद्ध आहे. आम्‍ही अशाच काही दंतकथा आपल्‍यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
विभीषणाशी केला विवाह 
- रावण वधानंतर मंदोदरी युध्‍दभूमीमध्‍ये येते. तेथे पति-पूत्र तसे इतर आप्‍तस्‍वकीयांचे शव पाहून ती पूर्णपणे खचते आणि अश्रू ढाळू लागते. मात्र श्रीराम तिला आठवण करुन देतात की, त्‍या अजुनही लंकेच्‍या महाराणी आणि बलशाली रावणची विधवा आहे. त्‍यानंतर मंदोदरी लंकेला परतते. 
- अद्भूत रामायण आणि इतर काही ग्रंथात असे म्‍हटले आहे की, मंदोदरीला पति-पुत्राचाचे इतके दु:ख होते की, ती स्‍वत:ला राजमहालात बंद करुन घेते. ती बाहेरच्‍या जगाशी पूर्णपणे संबंध तोडते. यावेळी विभिषण लंकेचा राजकारभार सांभाळतो. 
- एक वंदता अशी ही आहे की, काही वर्षांनंतर मंदोदरी आपल्‍या महालाबाहेर येते आणि विभिषणसोबत विवाहास तयार होते. विवाहानंतर विभिषण आणि मंदोदरी दोघेही मिळून लंकेचा राजकारभार सांभाळतात. 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या...मंदोदरीबद्दल आणखी काय काय कथा आहे प्रचलित.. 
 
बातम्या आणखी आहेत...