आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसार स्त्रियांबद्दल असा विचार करणेही मानले गेले आहे महापाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराणामध्ये व्यावहारिक जीवनातील असे अनेक चुकीचे काम किंवा विचार सांगण्यात आले आहेत. जे व्यक्तीच्या स्वभाव व सवयींमध्ये अशाप्रकारे सामावले जातात की, वारंवार सांगूनही त्यांना त्यांचा चुकीची जाणीव होत नाही.
धार्मिक दृष्टीकोनातून कोणताही व्यक्ती पापमुक्त नाही. कारण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती मन, वचन, कर्माने कोणते न कोणते तरी पाप नक्की करतो. काही लोक जाणूनबुजून पाप करत तर काही नकळतपणे, परंतु या पाप कर्माचे वाईट परिणाम नक्की दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, स्त्रियांशी सबंधित अशाच काही गोष्टी. ज्यांना गरुड पुराणामध्ये पाप मानण्यात आले असून या गोष्टी केल्या किंवा करण्याचा विचारही केला तरी त्या व्यक्तीला पापी मानण्यात आले आहे.

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
मातरं भगिनीं ये च विष्णुस्मरणवर्जिता:। अदृष्दोषां त्यजति स प्रेतो जायते ध्रुवम्।
भ्रातृधुग्ब्रह्महा गोघ्र: सुरापो गुरुतल्पग:। हेमक्षौमहरस्ताक्ष्र्य स वै प्रेतत्वमाप्रुयात्।।
न्यासापहर्ता मित्रधु्रक् परदारतस्तथा। विश्वासघाती क्रूरस्तु स प्रेतो जायते ध्रुवम्।।
कुलमार्गांश्चसंत्यज्य परधर्मतस्तथा। विद्यावृत्तविहीनश्च स प्रेतो जायते ध्रुवम्।।

या श्लोकाचा अर्थ सोप्या शब्दामध्ये सांगायचा झाल्यास...
- निरपराध आई, बहिण पत्नी, सून आणि मुलीला छेडणारा.
- गुरु पत्नीबद्दल मनामध्ये दुर्भाव ठेवणारा, भावासोबत धोका करणारा, गायीची हत्या करणारा, नशा करणारा, एखाद्या मनुष्य किंवा ब्राह्मणाला मृत्युतुल्य दु:ख देणारा आणि चोर.
- परस्त्रीशी संबंध ठेवणारा, घरातील वस्तुंची चोरी करणारा, मित्राला धोका देणारा, विश्वासघातकी आणि दुष्ट.
- अज्ञानी, दुराचरण करणारा, कुटुंब आणि धर्म परंपरेचा मार्ग सोडून चालणारा.
या सर्वांना प्रेत योनीमध्ये जावे लागते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार्‍या व्यक्तींना कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागते...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)