मृत्यू हे एक असे सत्य ज्याविषयी सर्वांना माहिती आहे, परंतु तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हिंदू धर्म ग्रंथामध्ये असे अनेक संकेत सांगण्यात आले आहेत ज्यावरून सहज समजू शकते की, कोणाचा मृत्यू केव्हा होणार. स्वप्न हे एक असे माध्यम आहे, ज्यामुळे आपल्याला मृत्यूपुर्वीचे संकेत मिळतात.
स्वप्न केवळ शुभ-अशुभ घटनांची माहिती देत नाहीत तर मृत्यूची भविष्यवाणीही करतात. वाल्मिकी रामायणामध्ये अशाच काही स्वप्नांचे वर्णन करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला रामायणात लिहिलेल्या स्वप्नांचे प्रसंग तसेच मृत्यूशी संबंधित स्वप्नांची माहिती सांगत आहोत.
वाल्मिकी रामायणानुसार राजा दशरथाचा मृत्यू झाला, त्या रात्री भरताने स्वप्नामध्ये त्याचे वडील दशरथ राजाला शेणाच्या कुंडात पोहताना पाहिले. काळ्या लोखंडाच्या चौकटीवर दशरथ राजा बसलेले होते. त्यांनी काळे वस्त्र परिधान केले होते आणि काळ्या रंगाच्या स्त्रिया त्यांच्यावर प्रहार करीत आहेत. भरताने स्वप्नात हे देखील पहिले की, राजा दशरथ लाल रंगाचा हार गळ्यात घालून आणि लाल चंदनाच्या गाढव जुंपलेल्या रथामध्ये बसून दक्षिण (यमाची दिशा) दिशेकडे जात आहेत.
मृत्युच्या स्वप्नांचे इतर संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...