आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र प्रकारे झाला होता द्रोणाचार्यांचा जन्म, या आहेत रोचक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरु द्रोणाचार्य महाभारतातील एक प्रमुख पात्र होते. कौरव आणि पांडवाना अस्त्र-शस्त्राचे शिक्षण गुरु द्रोणाचार्य यांनी दिले होते. महाभारताच्या आदी पर्वानुसार गुरु द्रोणाचार्य गुरु बृहस्पतीचे अंशावतार होते. द्रोणाचार्य महर्षी भारद्वाज यांचे पुत्र होते. महापराक्रमी अश्वत्थामा यांचाच मुलगा होता. गुरु द्रोणाचार्याच्या जन्माच्या कथेचे वर्णन महाभारतामध्ये करण्यात आले आहे, जे खालील प्रमाणे आहे...
द्रोणातून झाला होता द्रोणाचार्याचा जन्म
एकदा महर्षी भारद्वाज सकाळी गंगेत स्नान करण्यासाठी गेले असताना तेथे त्यांनी घृताची नामक अप्सरेला पाण्यातून बाहेर पडताना पाहिले. हे पाहून त्यांच्या मनामध्ये विकार आला आणि त्यांचे वीर्य स्खलित झाले. स्खलित वीर्य त्यांनी एक द्रोणामध्ये ठेवले आणि त्यामधूनच द्रोणाचार्य यांचा जन्म झाला होता. महर्षी भारद्वाज यांनी त्याच्या अग्निवेश्य नावाच्या शिष्याला आग्नेयास्त्रचे ज्ञान दिले होते. आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून अग्निवेश्यने द्रोणला आग्नेयास्त्रचे ज्ञान दिले.

परशुरामांनी दिले अस्त्र-शस्त्र
द्रोणाचार्य शिक्षण घेत असताना त्यांना समजले की, भगवान परशुराम ब्राह्मणांना आपले सर्वस्व दान करत आहेत. द्रोणाचार्यसुद्धा त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची ओळख त्यांना सांगितली. परशुराम यांनी द्रोणाचार्यांना सर्व दिव्य शस्त्र-अस्त्र आणि त्याचे ज्ञान दिले.

द्रोणाचार्याविषयी इतर काही रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...