आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Easy Step Of Worship For Get Success On Thursday

आज या देव पूजेच्या उपायाने मिळेल मनासारखे यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक ग्रहाचा शुभ प्रभाव यश, सुख-समृद्धी प्राप्त करून देणारा मानला गेला आहे. यासाठी धर्म प्रथांमध्ये प्रत्येक दिवसासाठी विशेष ग्रह मंत्राचे स्मरण करणे शुभ मानले जाते.

आज बृहस्पतीवार म्हणजे गुरुवारी देवगुरु बृहस्पतीच्या विशेष मंत्र स्मरणाने ज्ञान, बुद्धी, सुख-सौभाग्य, वैभव आणि मनासारखे यश मिळवणे सोपे जाईल. पौराणिक मान्यतेनुसार बृहस्पतीने महादेवाच्या कृपेने देवगुरुचे पद प्राप्त केले आहे. यामुळे बृहस्पती उपासना महादेवाला प्रसन्न करणारी मानली जाते.

इच्छापूर्ती आणि भाग्य बाधा दूर करण्यासाठी येथे सांगण्यात आलेला बृहस्पती मंत्र व पूजा उपाय सकाळच्या वेळी करणे प्रभावकारी मानले जाते.

- गुरुवारी सकळी स्नान केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून नवग्रह मंदिरात गुरु बृहस्पतीच्या प्रतिमेला केशर मिश्रित दुधाने आणि पवित्र पाण्याने अभिषेक करा. पिवळे चंदन, पिवळे फुल, पिवळे वस्त्र, हळद, पिवळे फळ अर्पण करून पूजा करा.

- गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून खालील मंत्राचे स्मरण करावे. मंत्र स्मरण आणि पूजा झाल्यानंतर गुरु ग्रहाशी संबंधित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. उदा. पिवळी डाळ, पिवळे वस्त्र, गूळ, सोने दान यथाशक्ती करावे.

जीवश्चाङ्गिर-गोत्रतोत्तरमुखो दीर्घोत्तरा संस्थित:
पीतोश्वत्थ-समिद्ध-सिन्धुजनिश्चापो थ मीनाधिप:।
सूर्येन्दु-क्षितिज-प्रियो बुध-सितौ शत्रूसमाश्चापरे
सप्ताङ्कद्विभव: शुभ: सुरुगुरु: कुर्यात् सदा मङ्गलम्।।