PHOTOS : संकटांपासून / PHOTOS : संकटांपासून वाचवतो सकाळचा हा छोटासा अचूक मंत्र उपाय

Mar 03,2014 12:00:00 PM IST

मनुष्य आणि निसर्गाचं फार जवळचं नात आहे. निसर्गाच्या प्रत्येक हलचालीचा मनुष्यावर आणि मनुष्याच्या प्रत्येक कामाचा प्रभाव निसर्गावर पडतो. प्राचीन ऋषी-मुनींनी हेच ज्ञान-विज्ञान समजून घेऊन ग्रह-नक्षत्रांना संसारिक जीवन नियत करणारे मानले आहे.

एवढेच नाही तर मनुष्याचा निसर्गाशी ताळमेळ जुळून राहावा यासाठी धार्मिक उपायांद्वारे ग्रह-नक्षत्रांची दैवी शक्तीच्या स्वरुपात पूजा-अर्चना करण्याचे महत्त्व सांगितले आहे. यानुसार प्रत्येक ग्रह जीवनात विशेष सुख-दुःख कारक मानला गेला आहे. शास्त्रामध्ये प्रत्येक दिवशी ग्रहाच्या खास मंत्राचे स्मरण संसारिक इच्छा पूर्ण करणारे मानले गेले आहे.

आज आम्ही तुम्हाला नवग्रह उपासनेसाठी दररोज कोणत्या शुभ मंत्राचे स्मरण करावे याची माहिती देत आहोत. या एका मंत्राच्या स्मरणाने सर्व नवग्रहांचे स्मरण होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास या विशेष मंत्राचे स्मरण केल्यास सर्व नऊ ग्रह बलशाली होऊन आपले भाग्य उजळवणारे ठरतात.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या प्रभावी मंत्र..

नवग्रह स्मरण मंत्र - ॐ ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानु: शशी भूमिसुतो बुधश्च। गुरुत्व शुक्रश्च शनिश्च राहु: केतुश्च सर्वे प्रदिशन्तु शं मे।।
X