Home | Jeevan Mantra | Dharm | Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

PHOTOS : एकादशीचे 11 चमत्कारी उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील

धर्म डेस्क | Update - Jan 10, 2014, 04:33 PM IST

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात.

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. ही तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असल्यामुळे भक्तगण श्रीहरिला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजन करतात. धर्म ग्रंथानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास श्रीहरी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ११ जानेवारी, शनिवारी पुत्रदा एकादशी आहे. शास्त्रानुसार या एकादशीचे विशेष महत्व आहे.

  विशेष उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  1 - भगवान श्रीविष्णूला पितांबरधारी असे म्हणतात, म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करणारा. पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळे फुल, पिवळे फळ, धान्य या गोष्टी विष्णूला अर्पण कराव्यात. त्यानंतर या सर्व वस्तू गरिबांना दान कराव्यात. हा उपाय केल्यास विष्णूदेवाची कृपा तुमच्यावर राहील.
  2 - पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. या उपायाने तुम्हाला जीवनात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  3 - जर तुम्हाला अपार धनाची इच्छा असेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात जाऊन पांढरी मिठाई किंवा खीर नैवेद्य दाखवावी. यामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकावे.
  4 - या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून श्रीविष्णूला अभिषेक करावा. या उपायाने भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतील.

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  5- धनाची इच्छा असणार्या साधकाने पुत्रदा एकादशीच्या दिवशी खालील मंत्राचा पाच माळ जप करावा.
  मंत्र - ऊँ ह्लीं ऐं क्लीं श्री:
  एकादशीच्या दुसर्या दिवशी ब्राह्मणाला भोजनासाठी आमंत्रित करून दक्षिणा, वस्त्र देवून तृप्त करावे.
  6- जर तुम्ही कर्जामुळे अडचणीत असाल तर एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. पिंपळाच्या झाडामध्ये श्रीविष्णूचा वास मानला गेला आहे. या उपायाने तुम्ही कर्जमुक्त व्हाल.

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  7 - खूप प्रयत्न, कष्ट करून उत्पन्नामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी सात कुमारिकांना घरी जेवणासाठी आमंत्रित करावे. जेवणामध्ये खीर अवश्य असावी. थोड्याच दिवसांमध्ये बदल दिसून येईल.
  8 - पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक नारळ आणि थोडे बदाम भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करावेत. या उपायाने जीवनात सर्व सुखांची प्राप्ती होईल.

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  9 - पुत्रदा एकादशीच्या दिवशी भवन विष्णूची पूजा करतना थोडे पैसे पूजेमध्ये ठेवावेत. पूजा झाल्यानंतर पूजेतील पैसे पाकिटात ठेवावेत. हा उपाय केल्यास तुमचे पाकीट सदैव पैशांनी भरलेले राहील.
  10 - या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ऊँ वासुदेवाय नम: या मंत्राचा उच्चार करीत तुळशीला ११ प्रदक्षिणा घालाव्यात. या उपायाने घरामध्ये सुख-शांती राहील.

 • Ekadashi S 11 Miraculous Remedy, Will Fulfill Your Every Wish.

  11 - पुत्रदा एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. या उपायाने सर्व सुखांची प्राप्ती होईल.

Trending