आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तात्रेय, जनार्दन, श्री एकनाथ महाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. या संप्रदायाचे भक्कम आधारस्तंभांपैकी एक म्हणजे संत श्री एकनाथ महाराज. अध्यात्मासोबतच समाजसुधारक असलेल्या श्री नाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये (शके 1455 दरम्यान) पैठण येथे झाला. महाराजांचे पणजोबा सूर्योपासक होते. लहानपणापासूनच एकनाथांना सद्गुरूंची ओढ लागली होती.
श्री जनार्दन स्वामी देवगिरी (दौलताबाद) येथे असताना नाथ महाराज त्यांच्याकडे गुरुमंत्र घेण्यासाठी गेले होते. स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली. दोन ते तीन दिवस त्यांनी दारच उघडले नाही. नाथ महाराजही दरवाजाजवळ बसूनच होते. दरवाजा उघडताच नाथ महाराजांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले. गुरूच्या पहिल्या कसोटीत नाथ महाराज यशस्वी झाले. स्वामींनी त्यांना गुरुमंत्र दिला. जनार्दन स्वामी दत्त उपासक होते. नाथ महाराजांनी ‘शूलिभंजन’ (जि. औरंगाबाद) पर्वतावर गुरुदत्ताची उपासना केली. साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना
दर्शन दिले.
नाथ महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अत्यंत कसोटी पाहणारा होता. बालपणात माता रुक्मिणी आणि पिता सूर्यनारायण (सूर्याजी) यांची, तर गृहस्थाश्रमात पत्नी गिरिजेची त्यांना साथ लाभली. नाथ महाराजांचे
पुत्र हरिपंत हेही महाराजांप्रमाणेच विद्वान होते. फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 (इ.स. 1599) मध्ये त्यांनी देह ठेवला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून
ओळखला जातो. पैठण (जि. औरंगाबाद) येथे नाथषष्ठीच्या दिवशी मोठी यात्रा भरते.