आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eunuchs Made Akhara, The President Speak Will Not Bath

किन्नरांचा पहिला आखाडा, बिग बॉस फेम लक्ष्मी झाली आखाडा प्रमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैनपासून 5 किलोमीटर अंतरावरील हासामपुरा येथे देशातील पहिला किन्नर आखाडा निर्माण करण्यात आला आहे. बिग बॉस फेम लक्ष्मी नायरन त्रिपाठी, सागरच्या माजी महापौर कामाला बुआ व ऋषी अजयदास यांनी या आखाड्याची स्थापना केली आहे. आखाड्याची स्थापना करताच किन्नरांनी पीठाधीश्वर आणि 2 महंतांचीसुद्धा नियुक्ती केली आहे. प्रमुख आखाड्यांप्रमाणे किन्नरांनीसुद्धा त्यांच्या आखाड्याचा एक विशेष ध्वज निर्धारित केला आहे. या ध्वजाचा रंग पांढरा असून बॉर्डर सोनेरी रंगाची असेल. किन्नरांनी प्रशासनाकडे सिंहस्थसाठी जमिनीची आणि स्नान करण्याची परवानगी मागितली आहे.

कोण आहे लक्ष्मी नारायण ?
लक्ष्मी नारायण एक टीव्ही कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. मागील काही काळापासून या किन्नर समाजाच्या हितासाठी कार्य करत आहेत. बिग बॉस सिझन 5 मध्ये लक्ष्मीचा सहभाग होता. टीव्ही शो सच का सामना, दास का दम आणि राज पिछले जन्म का या कार्यक्रमामध्येसुद्धा यांचा सहभाग होता.

महंत व पीठाधीश्वर पद
ऋषी अजयदास यांनी सांगितले की, आखाडा प्रमुख लक्ष्मी नारायण यांनी 6 पीठाधीश्वर आणि 2 महंतांची नियुक्ती केली आहे. मुंबईच्या लक्ष्मीगिरीजी महाराज आणि आरतीगिरीजी महाराज यांना नायक (महंत) पद देण्यात आले आहे. छत्तिसगढच्या विद्या राजपूत, रविना वरिहा व राजस्थानच्या पुष्पा गिडवानी यांना पीठाधीश्वर पद देण्यात आले आहे. इतर 3 पीठाधीश्वरांच्या नावाचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. यानंतरची दुसरी मिटिंग जयपुर येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तिसगढ इ. राज्यांमध्येसुद्धा मिटिंग घेऊन किन्नरांना आखाड्याशी जोडले जाईल.

या आखाड्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...