आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुराण : पूर्वी एवढे कडक नियम होते पत्नीसाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती-पत्नी एक गाडीचे दोन चाकं मानले जातात. गृहस्थी रूपातील ही गाडी या दोघांच्या समान विचारांनी पुढे चालत राहते. हिंदू धर्म ग्रंथामध्ये बायकोला नवर्‍याची अर्धांगिनी मानले गेले आहे. स्वतः महादेवाने अर्धनारीश्वर स्वरुपात पत्नीच्या या रुपाला साकार केले आहे. पुराणांमध्ये पत्नी धर्माबद्दल विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पत्नीसाठी एक मर्यादा ठरवलेली आहे. शिवमहापुरणातील रुद्रसंहितेमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगात पतिव्रता स्त्रीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी माता पार्वतीला एका ब्राह्मण पतिव्रता पत्नीने सांगितल्या आहेत. व्यवहारिक दृष्टीने वर्तमान काळात या गोष्टींचे अनुकरण करणे फार कठीण आहे.

1. शिवमहापुरणानुसार धर्मामध्ये तत्पर असणार्‍या स्त्रीने आपल्या पतीने जेवण केल्यानंतरच जेवण करावे.
2. पती उठून उभा राहिल्यानंतर पत्नीने उभे राहावे.
3. पती झोपल्यानंतर झोपावे आणि सकाळी पती झोपेतून उठण्यापूर्वी उठावे.
4. पतीच्या परवानगीशिवाय व्रत-उपवास करू नये.
5. पतीच्या गुप्त गोष्टी पत्नीने इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या,शिवमहापुराणानुसार पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीसोबत कसे राहावे...
बातम्या आणखी आहेत...