आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : जेव्हा शनिदेवाने मान्य केला नाही रावणाचा हा आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि मंद गतीने चालणारा ग्रह आहे. यामुळे शनि एकाच राशीत जवळपास अडीच वर्ष राहतो. शनिदेव मंद गतीने का चालतात या संदर्भात एक प्रसंग सांगण्यात आला आहे. हा प्रसंग रावण आणि शनिदेवाशी संबंधित आहे.

रावण आणि मंदोदरीचा मुलगा मेघनादाच्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे. आपला मुलगा अजय व्हावा, त्याला देव कधीही पराभूत करू शकणार नाहीत तसेच तो दीर्घआयुषी, कुशल योद्धा, पराक्रमी, आणि ज्ञानी व्हावा, अशी रावणाची इच्छा होती. रावण हा एक विद्वान पंडीत होता. त्याला ज्योतिषशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. रावणाने सांगितलेले सर्व गुण त्याच्या मुलात यावे म्हणून अनुकुल परिस्थिती तयार करण्याचा ग्रहांना आदेश दिला. रावणाच्या शक्तीमुळे त्याला सर्व देवी-देवता आणि ग्रह-नक्षत्र घाबरत होते.

रावणाला घाबरून मेघनादच्या जन्माच्या वेळी सर्व ग्रह-नक्षत्र रावणाच्या आदेशानुसार कुंडलीमध्ये उपस्थित झाले. शनि हा आयुष्य ठरवणारा देव आहे आणि तो आपले म्हणणे सहजासहजी मान्य करणार नाही याची रावणाला जाणीव होती. तरीदेखील रावणाने शनिलाही त्याने सांगितलेल्या आदेशानुसार कुंडलीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, संपूर्ण प्रसंग...