आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक हल्ल्यांनंतरही शीख बांधवांनी तडफेने उभे केले अमृतसरचे सुवर्णमंदिर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची ख्याती जगभरात पसरली असून मोठ्या संख्येने देश-विदेशातील लोक येथे पोहचतात. शीख धर्माच्या लोकांसोबतच इतर धर्माचे लोकही येथे श्रद्धेने नतमस्तक होतात. जुन्या काळी अनेकदा सुवर्ण मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु भक्ती आणि श्रद्धेमुळे शिखांनी या मंदिराला प्रत्येक वेळी पुन्हा उभे केले.
मंदिराला कोणकोणत्या वेळी नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि कितीवेळा मंदिर उभारले गेले याचा क्रम मंदिरात दर्शवण्यात आला आहे. 19 व्या शतकात अफगाणिस्तानातील हल्लेखोरांनी या मंदिरला पूर्णपणे नष्ट केले होते. त्यानंतर महाराज रणजीत सिंह यांनी या मंदिराची पुन्हा उभारणी करून सोन्याचा मुलामा चढविला.

येथे जाणून घ्या, शीख धर्माच्या सर्वात पवित्र सुवर्ण मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी...
सुवर्ण मंदिराला म्हणतात श्री हरमंदिर साहेब
सुवर्ण मंदिराला हरमंदिर साहेब किंवा दरबार साहेब असेही म्हटले जाते. या मंदिरावर सोन्याचा मुलामा असल्यामुळे याला सुवर्ण मंदिर असे म्हणतात. शीख धर्म गुरूला ईश्वर समान मानले जाते. सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी लोक मंदिरासमोर नतमस्तक होतात आणि नंतर हात-पाय धुतल्यानंतर मंदिरात पोहचतात. सुवर्ण मंदिरात घडलेल्या सर्व घटनांचा इतिहास मंदिरात लिहिण्यात आला आहे.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी....