आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Mountain Day On 11 December: Know The Facts About Govardhan Parva

महाभारत काळातील या पर्वताची होत आहे झीज, कलियुगाच्या अंतापर्यंत सामावेल जमिनीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेले भक्त)

(11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय माउंटन डे आहे. या निमित्ताने जाणून घ्या शास्त्रामध्ये पूजनीय असलेल्या प्राचीन गोवर्धन पर्वताशी संबंधित खास माहिती)

श्रीकृष्ण स्वतः नारायणाचे अवतार आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, महाभारत काळात श्रीकृष्णाने कोणाला पूजनीय सांगितले आहे. गोकुळ-वृंदावनमधील लोकांना कोणाची पूजा करण्यासाठी प्रेरित केले होते? हजारो वर्षांपूर्वी देवकीनंदन श्रीकृष्णने गोकुळ आणि वृंदावनच्या लोकांना गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी प्रेरित केले होते. तेव्हापासून भक्त या पर्वताची पूजा करतात. या पर्वताला तिळ-तिळ झीजण्याचा शाप देण्यात आला असल्यामुळे महाभारत काळातील या पर्वताची झीज होत आहे. कलियुगाच्या अंतापर्यंत हा पर्वत पृथ्वीमध्ये सामावला जाईल असे मानण्यात येते. गोवर्धन पर्वत मथुरेजवळ स्थित आहे. दिल्लीपासून मथुरा 160 किलोमीटर दूर आहे.

गोवर्धन पर्वताची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आजही प्रचलित आहेत. याच कारणामुळे यथे भक्तांची रीघ लागलेली असते. गोवर्धन पर्वताच्या प्रदक्षिणेचे विशेष महत्त्व आहे.

गोवर्धन पर्वताची उंची सध्या कमी दिसत असली तर हजारो वर्षांपूर्वी हा खूप विशाल आणि उंच पर्वत होता. या पर्वताची सातत्याने झीज होत आहे. या संदर्भात शास्त्रामध्ये एक कथा सांगण्यात आली आहे. कथेनुसार गोवर्धन पर्वताला एका ऋषीने शाप दिला होता.

पुढे जाणून घ्या, महाभारत काळापासून प्रचलीत असलेल्या गोवर्धन पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी....