मुंबईतील ‘लालबागचा राजा’चा फर्स्ट लूक शुक्रवारी (11 सप्टेंबर) दाखवला गेला. कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी तब्बल 21 लाख बेल्जियम काचांच्या तुकड्यांपासून उभारलेल्या उदयपूरच्या शिशमहालाच्या प्रतिकृतीत हा राजा विराजमान होईल. कर्जतच्या एनडी स्टुडिओत हा शिशमहाल उभारण्यात आला होता, आता लालबागचा राजा या शिशमहलात विराजमान होणार आहे. भावी-भक्तांना राजाच्या प्रवेशद्वारापासूनच शिशमहालात जात असल्याचा भास होईल, असे देसाई यांनी सांगितले.
लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत आहे. या विघ्नहर्त्याचे दर्शन एकदा घडावे यासाठी भक्त तासन् तास रांगा लावून उभे असतात. यंदा लालबागच्या राजाचे अनोखे रुप भक्तांना पाहायला मिळणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लालबागच्या राजाचे आणखी काही फोटो...