सध्याच्या काळात मनुष्याच्या जीवनातील अडचणींचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनियमित दिनचर्या. धर्मशास्त्राच्या दृष्टीने जीवनाला संयम आणि नियमात
आपण ठेवू शकलो नाहीत, तर अडचणी सुरूच राहणार. स्वस्थ आणि सुखी जीवनासाठी आहार म्हणजेच खाण्या-पिण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
अनैसर्गिक जीवनशैलीमुळे आधुनिक मनुष्य शरीर आणि मनाने कमकुवत आणि रोगी बनत आहे. अन्नाने विचार बनतात आणि विचारांनी एखाद्याचे व्यक्तिमत्त्व घडते. प्रदूषित आचार, विचार, आहार आणि विहारातील अनियमीततेमुळेच आधुनिक मानवाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनुष्याने कोणत्या प्रकारचे अन्न किती प्रमाणात खावे, याचे उत्तर महाभारतातील एक श्लोकामध्ये फार सोप्या पद्धतीने सांगण्यात आले आहे.
गुणाश्च षण्मितभुक्तं भजन्ते आरोग्यमायुश्च बलं सुखं च।
अनाबिलं चास्य भवत्यपत्यं न चैनमाद्यूत इति क्षिपन्ति।।
अर्थ - स्वल्पाहार म्हणजे थोडे किंवा जेवढी भूक लागली आहे त्यापेक्षा थोडे कमी खाल्याने सहा फायदे होतात.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सहा महत्वाचे फायदे ....
(फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)