आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रीं’चा प्रगट दिन : पाहा विदेशी पर्यटन स्थळांना लाजवणारे शेगावचे आनंद सागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव : योगिराज श्री संत गजानन महाराजांचा आज (18 फेब्रुवारी, शनिवार) 139 वा प्रकट दिन आहे. या महोत्सवानिमित्त मागील आठवडाभरापासून संतनगरीत दररोज राज्यातील शेकडो भजनी दिंड्या वारकऱ्यांसह श्री च्या दर्शनासाठी येत आहेत. आज श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावात भाविकांनी गर्दी केली असून  भाविक आनंद सागरलाही भेट देत आहेत.  आनंद सागर देशातील प्रेक्षणीय पर्यटन स्‍थळांपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला या निमित्ताने आनंद सागरमधील काही खास फोटो दाखवत आहोत.

भाविकांसाठी आहेत या सुविधा..
- मंदिर व शेगाव रेल्‍वे स्‍टेशनपासून आनंद सागरला जाण्‍यासाठी संस्‍थानची विनामुल्‍य बससेवा भाविकांसाठी आहे.
- आनंद सागर परिसरात संत गजानन महाराज संस्थानने भक्तांसाठी निवास व भोजनाची स्वस्त दरात सोय केली आहे.
- संत गजानन महाराज मंदिराप्रमाणे आनंदसागरमध्‍येही शेकडो सेवाधारी भाविकांसाठी कार्यरत आहेत.
- आनंद सागरचा विस्‍तार हा सुमारे 325 एकर जागेवर आहे.
- शेगाव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे 2.5 km अंतरावर आनंद सागर आहे.
- खासगी ऑटो किंवा टांग्यांनेही पर्यटक आनंद सागरपर्यंत प्रवास करतात.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आनंद सागरमधील सुंदर फोटो....
बातम्या आणखी आहेत...