आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावची गजलक्ष्मी घालते चप्पल, रोज आरतीला जाते मंदिरात, वाचा Interesting Fact

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगिराज श्री संत गजानन महाराजांचा आज (18 फेब्रुवारी, शनिवार) 139 वा प्रकट दिन आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शेगाव मंदिराची खास माहिती आणि संस्‍थानमधील हत्‍तीणीविषयी सांगत आहोत. 

शेगाव येथील प्रसिद्ध श्री संत गजानन महाराज संस्‍थानकडे सध्‍या लक्ष्‍मी ही हत्‍तीण आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी श्रींची दैनंदिन आरती मोठ्या थाटात साजरी होते. या आरतीला ही गजराणीही नित्‍याने उपस्‍थित असते. या हत्‍तीणीच्‍या लिला पाहून भाविकही कुतूहल व्‍यक्‍त करतात.
 
- गजानन महाराज संस्‍थानकडे यापूर्वी चंपाकली नावाची हत्‍तीण होती.
- चंपाकलीच्‍या निधनानंतर संस्‍थानमध्‍ये बिहारमधील ‘लक्ष्मी’ हत्तीणीचे आगमन झाले.
- गजराणी लक्ष्‍मीच्‍या राहण्‍याची संस्‍थानतर्फे उत्‍तम सोय केली जाते.
- पायाला दुखापत होऊ नये म्‍हणून संस्‍थानतर्फे या हत्‍तीणीला चपला बनवण्‍यात आल्‍या.
- लक्ष्‍मीच्‍या आरोग्‍याची सेवेकरी पूर्णपणे काळजी घेतात.

दोन वेळा होते दैनंदिन आरती...
- श्री संत गजानन महाराज मंदिरात दररोज दोनवेळा आरती होते.
- सकाळी 8 वाजता, सायंकाळी सूर्यास्‍ताला श्रींची आरती होते.
- या दोनही आरतीला न चुकता गजराणी लक्ष्‍मीची उपस्‍थिती असते.
- भाविकांप्रमाणे या हत्‍तीणीच्‍या चपलाही स्‍टँडवर काढल्‍या जातात.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा..
काय आहे शेगाव नावाचा इतिहास..
1908 मध्‍ये संस्‍थान स्‍थापना..
अशी आहे दर्शनाची व्‍यवस्‍था..
प्रथमोचार केंद्र व मातांसाठी खास सुविधा..
बातम्या आणखी आहेत...