Home | Jeevan Mantra | Dharm | Ganesh Chaturthi Today The Easiest Method To Do This Fast, Every Wish Will Be Fulfilled

गणेश चतुर्थी आज : या सोप्या विधीनुसार करा व्रत, पूर्ण होतील सर्व इच्छा

दिव्य मराठी | Update - Nov 21, 2013, 01:07 PM IST

हिंदू पंचागानुसार प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला श्रीगणेशाचे व्रत केले जाते.

 • Ganesh Chaturthi Today The Easiest Method To Do This Fast, Every Wish Will Be Fulfilled

  हिंदू पंचागानुसार प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला श्रीगणेशाचे व्रत केले जाते. या महिन्यात आज २१ नोव्हेंबर गुरवारी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधीपूर्वक पूजा, उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

  गणेश चतुर्थीचे व्रत पुढीलप्रमाणे करावे....

 • Ganesh Chaturthi Today The Easiest Method To Do This Fast, Every Wish Will Be Fulfilled

  गणेश चतुर्थी व्रत विधी
  - सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत.
  - दुपारी आपल्या सोने, चांदी, तांबे, पितळ, किंवा मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करावी.
  - स्थापना केल्यानंतर श्रीगणेशाची पंचोपचार पूजा करून आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला गुलाल, ऊँ गं गणपतयै नम: मंत्राचा उच्चार करीत २१ दुर्वा अर्पण कराव्यात.
  - २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यातील पाच मोदक मूर्तीजवळ ठेवावेत, पाच मोदक एखाद्या ब्राह्मणाला दान करावेत आणि इतर मोदकांचा प्रसाद वाटावा.
  - पूजा करताना गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत. या दिवशी उपवास करावा.
  या व्रताचे श्रद्धापूर्वक पालन केल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होईल आणि सर्व अडचणी दूर होतील.

Trending