आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival Maharashtra India Leaders News In Marathi

देश-विदेशात गणेशोत्सवाची धूम, चव्हाण, गडकरी, सुशीलकुमार यांच्या घरी बाप्पा विराजमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज गणेश चतुर्थी. आज देश-विदेशात गणेशोत्सवाची धूम दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही गणेशोत्सवात उत्साहाने भाग घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रीया सुळे, पंकजा मुंडे-पालवे, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटरवरून तमाम मराठी जनतेला शुभेच्छा देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की गणपती बाप्पा मोरया! श्रीगणेशाचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो व महाराष्ट्र संपन्न होवो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
दिल्लीत महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीच्या वेगवगेळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणेशमुर्तींची स्थापना करण्यात आली.
पुढील स्लाईडवर बघा, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आदित्य ठाकरे, शिवराजसिंह चौहान यांचे बाप्पा...दिल्लीतील गणेशोत्सव...पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा...