आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाची सुरुवात या गणेश मंत्राचे स्मरण करून केल्यास प्रत्येक कामात मिळेल यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला यश प्रदान आणि विघ्नांचा नाश करणारे देवता मानले गेले आहेत. श्रीगणेश बुद्धीचे स्वामी आहेत. प्रत्येक कामाची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. सध्या गणेशोत्सव सुरु असून शास्त्रानुसार या दहा दिवसांमध्ये श्रीगणेश भक्तीचा एक विशेष उपाय केल्यास सर्व इच्छा आणि कार्यसिद्धी पूर्ण होते. येथ जाणून घ्या, यश प्राप्त करून देणारा हा छोटासा गणेश मंत्र उपाय..
अवघड आणि मोठ्यातील मोठे काम सहज-सोपे बनवणारा गणेश भक्तीचा छोटासा उपाय आहे - श्रीगणेशाच्या 12 विशेष नावांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करणे.

गणपतिर्विघ्रराजो लम्बतुण्डो गजानन:।
द्वेमातुरश्च हेरम्ब एकदन्ती गणाधिप:।।
विनायकश्चारुकर्ण: पशुपालो भवात्मज:।
द्वाद्वशैतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेत्।।

अर्थ - गणपती, विघ्नराज, लम्बतुण्ड, गजानन, द्वैमातुर, हेरंब, एकदंत, गणाधिपती, विनायक, चारुकर्ण, पशुपालक व भवात्मज या 12 नावांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.