आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Mantra For Make Task Successful On Wednesday

आज या गणेश मंत्र उपायाने पूर्ण होतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीगणेशाचे एक रूप 'भालचंद्र' नावाने पूजनीय आहे. सरळ शब्दात भालचंद्रचा अर्थ आहे, भाल म्हणजे मस्तका (कपाळ)वर चंद्र धारण करणारा. श्रीगणेशाच्या या नावामध्ये यशस्वी जीवनाचे एक महत्वपूर्ण सूत्र आहे. शास्त्रामध्ये चंद्राला सर्व जीवांच्या मनाचे नियंत्रक मानले जाते, तर श्रीगणेश बुद्धी दाता आहेत. मस्तक हे बुद्धीचे केंद्र आहे. श्रीगणेशाने मस्तकावर चंद्राला धारण केले आहे. चंद्र हा शीतल आणि शांत आहे.

यातून आपल्याला असा संकेत मिळतो, की यश आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मन-मस्तिष्कला शांत ठेऊन वाईट आणि नकारत्मक गोष्टींपासून दूर राहावे. मानसिक धैर्य, संयम आणि समजूतदारपणा हेच गुण मनुष्याला जीवनात यशस्वी आणि सुखी बनवतात.

बुधवारी श्रीगणेश उपासनेमध्ये भालचंद्र स्वरूपाचे ध्यान करून सुनिश्चित यशाच्या या सूत्राचा अवलंब करणे हा प्रभावी उपाय मानला गेला आहे. यासाठी बुधवारी सकाळी आणि संध्याकळी गणपतीची विधिव्रत पूजा करून खालील विशेष मंत्राचे ध्यान करावे.

निराकृते नित्यनिरस्तमाय परात्पर ब्रह्ममयस्वरूप।
क्षराक्षरातीतगुणैर्विहीन दीनानुकस्मिन् भगवन्नमस्ते।
निरामयाखिलकामपूर निरञ्जनायाखिलदैत्यदारिन्।
नित्याय सत्याय परोपकारिन् समाय सर्वत्र नमो नमस्ते।।