या श्रीगणेश मंत्र / या श्रीगणेश मंत्र स्तुतीने कुटुंबावर राहील महालक्ष्मीची कृपा

Mar 04,2014 05:13:00 PM IST

श्रीगणेश हे सिद्धीदाता आहेत, म्हणजे यांची उपासना केल्याने बुद्धी, ज्ञान, बळ, यश, समृद्धी प्राप्त होते. विचार आणि कर्म शक्तीचा ताळमेळ साधून सुख-समृद्धी, धन-ऐश्वर्य प्राप्त करणे सहज शक्य आहे. अशा प्रकारे श्रीगणेशाची कृपा देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारी मानली गेली आहे. याच कारणामुळे देवी लक्ष्मीसोबत श्रीगणेशाची पूजा केली जाते.

शास्त्रानुसार बुधवार हा श्रीगणेशाच्या उपासनेचा वार आहे.शास्त्रामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छेने भगवान गणेशाच्या एक विशेष मंत्र स्तुतीचे स्मरण करणे शुभ मानले गेले आहे. या मंत्र स्तुतीचे विशेषतः बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी स्मरण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

श्रीगणेश भक्तीच्या विशेष दिवशी सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची लाल गंध, लाल फुल, दुर्वा, अक्षता अर्पण करून पूजा करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून आरती करावी. त्यानंतर खाली दिलेल्या गणेश मंत्र स्तुतीचे स्मरण करावे...

ॐ नमो विघ्रराजाय सर्वसौख्यप्रदायिने।
दुष्टारिष्टविनाशाय पराय परमात्मने।।
लम्बोदरं महावीर्यं नागयज्ञोपशोभितम्।
अर्द्धचन्द्रधरं देवं विघ्रव्यूहविनाशनम्।।
ॐ ह्राँ ह्रीं ह्रूँ ह्र: हेरम्बाय नमो नम:।
सर्वसिद्धिप्रदोसित्वं सिद्धिबुद्धिप्रदोभव।।
चिन्तितार्थप्रदस्त्वं हि सततं मोदकप्रिय:।
सिन्दूरारूणवस्त्रैश्च पूजितो वरदायक:।।
इदं गणपतिस्तोत्रं य: पठेद् भक्तिमान् नर:।
तस्य देहं च गेहं च स्वयं लक्ष्मीर्नमुञ्चति।।

X