आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garuda Purana Such Wife Friend Servant And Home Should Be Avoided

गरुड पुराण : अशा पत्नी, मित्र, नोकर आणि घरापासून नेहमी राहवे सावध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या धर्म ग्रंथांमध्ये विविध अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या फक्त आपल्याला लाईफ मॅनेजमेंटचे सूत्र शिकवत नाहीत तर आपण कोणत्या प्रकारच्या लोकांच्या संगतीत राहावे याबद्दलही सांगतात. गरुड पुराण ग्रंथामध्ये जीवनाशी संबंधित विविध गुप्त गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टी जाणून घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे.
वर्तमान काळाचा विचार केल्यास पत्नी, मित्र आणि नोकर आपले परम सहयोगी असतात तसेच स्वतःचे घर असल्यास आपण शांतीचा अनुभव करतो. गरुड पुराणामध्ये या सर्वांबद्दल लिहिण्यात आले आहे की, दुष्ट पत्नी आणि मित्र, वाद घालणारा नोकर तसेच ज्या घरामध्ये साप निघतात तेथे निवास करणे साक्षात मृत्युसामान आहे. येथे जाणून घ्या, हे सर्वजण कशाप्रकारे आपल्यासाठी घातक ठरू शकतात.

दुष्ट पत्नी -
हिंदू धर्मामध्ये पत्नीला खूप सन्माननीय मानले गेले आहे. पत्नीला त्रासदायक वागणूक देण्याचा विचार करणेही चुकीचे आहे. पत्नीला अर्धांगिनी मानले जाते म्हणजेच शरीराचा अर्धा भाग. परंतु पत्नीचा स्वभाव दुष्ट असेल तर ती कोणत्याही रुपात तुमचे नुकसान करू शकते.

दुष्ट म्हणजे अशी पत्नी जी पतीच्या मनाविरुद्ध सर्व कार्य करणारी तसेच परपुरुषाचा विचार करते. अशी पत्नी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. यामुळे दुष्ट पत्नीसोबत राहणे साक्षात मृत्युसमान मानले जाते.

दुष्ट मित्र आणि वाद घालणारा नोकर तसेच सर्पयुक्त घर कशाप्रकारे आपल्यासाठी घातक आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...