आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गोष्टींवरून समजते मृत्युनंतर कोणाचे कसे हाल होणार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म शास्त्रामध्ये केवळ जीवन जगताना चांगल्या किंवा वाईट कर्मांना सुख आणि दुःखाचे कारण मानले नसून या कर्मांना मृत्युनंतरही सुख किंवा दुःख देणारे सांगितले आहे. यालाच दुसर्‍या शब्दात सद्गती किंवा दुर्गती म्हटले जाते. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यामुळे प्रत्येक ग्रंथामध्ये नेहमी चांगले गुण, विचार आणि आचरण करण्याची शिकवण देण्यात आली आहे. मृत्यूशी संबंधित विविध रहस्य धर्मशास्त्र गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या कोणाचा मृत्यू कसा होतो. गरुड पुराणामध्ये जीवनात केल्या गेलेल्या चांगल्या-वाईट कर्मानुसार मृत्युच्या वेळी कशी स्थिती निर्माण होते, या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे.

- सत्य बोलणार्‍या, देवावर विश्वास ठेवणार्‍या, जे लोक विश्वासघाती नसतात त्यांना सुखद मृत्यूची प्राप्ती होते.

- असे लोक जे इतरांना आसक्ती, मोहाचा उपदेश देतात, अविद्या आणि अज्ञानता, द्वेष किंवा स्वार्थ, लोभाची भावना पसरवतात त्यांना मृत्युच्या वेळी खूप त्रास सहन करावा लागतो.

- असत्य बोलणार्‍या, खोटी साक्ष देणार्‍या, विश्वास तोडणार्‍या, शास्त्र आणि वेदांची निंदा करणार्‍या व्यक्तीची सर्वात जास्त प्रमाणात दुर्गती होते. यांना बेशुद्ध अवस्थेत मृत्यू येतो.

पुढे जाणून घ्या, पाप करणार्‍या व्यक्तीला यमलोकात कशा प्रकारे नेण्यात येते...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)