आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौतम बुद्धांचे दुःख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या प्राचीन धर्म परंपरा निःपक्षपातीपणे अभ्यासून संपूर्ण विश्वातील मानवांना एका झेंड्याखाली एकत्र आणणाऱ्या सिंहासनाचा शोध हा अराजकाकडे वाटचाल करणाऱ्या विश्व मानवाचा संहार थोपविणारा ठरू शकेल काय? या प्रश्नाचे उत्तर शोधताना समोर राजपुत्र सिद्धार्थ गौतम, चक्रवर्ती राजा अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहतात. सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील कपिलवस्तू या राज्यात इ. स.पूर्व ५६७ मध्ये राजा सिद्धोधन व राणी महाप्रजापती गौतमी यांच्या पोटी झाला. नेपाळमधील आजचे ते ठिकाण लुम्बिनी म्हणून प्रसिद्ध आहे. राजा सिद्धोधन यांनी सिद्धार्थाला वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत राज्यातील जनतेच्या सुख-दुःखाचा व बाह्य जगाचा ऊनवारा लागू दिला नव्हता. वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थाचा राजकन्या यशोधराशी विवाह झाला. एकदा सिद्धार्थ राज्यात फेरफटका मारत असताना त्याने एक जर्जर लंगडा म्हातारा, आजाराशी झुंज देत असलेला मनुष्य, एक प्रेतयात्रा आणि एक पाशविरहित योगी पाहिला. तेव्हापासून सिद्धार्थाचे मन संसार आणि राजवैभवाला विटले. तो "अस्तित्वा'चा शोध घेऊ लागला. जन्माला येणे, म्हातारपण येणे, आजारी पडणे व मृत्यू होणे कुणी थांबवू शकत नाही, या जीवनातील अटळ व क्षणभंगुर अस्तित्वाचा शोध गौतमाला लागला.
प्रा. विष्णू बोरकर, अहमदनगर
बातम्या आणखी आहेत...