आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायत्री जयंती आज : सर्व इच्छा पूर्ण करते देवी गायत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये गायत्री देवीला वेदमाता म्हटले जाते, म्हणजे सर्व वेदांची उत्पत्ती यांच्यापासून झाली आहे. देवी गायत्रीला भारतीय संस्कृतीची जननीसुद्धा मानले जाते. धर्म शास्त्रानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवी गायत्रीचे अवतरण झाल्याचे मानले जाते. हा दिवस गायत्री जयंती रुपात साजरा केला जातो. या वर्षी गायत्री जयंती 28 मे, गुरुवारी आहे.

धर्म ग्रंथानुसार देवी गायत्रीची उपासना करणाऱ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. देवी गायात्रीपासून आयु, प्राण, प्रजा, पशु, कीर्ती, धन आणि ब्रह्मवर्चस हे सात प्रतिफळ अथर्ववेदामध्ये सांगण्यात आले असून, हे विधीपूर्वक उपासना करणाऱ्या साधकाला निश्चितच प्राप्त होतात. विधीपूर्वक करण्यात आलेल्या उपासनेने साधकाच्या चारही बाजूला रक्षा कवच निर्माण होते.

हिंदू धर्मामध्ये देवी गायत्रीला पंचमुखी मानले गेले आहे. याचा अर्थ हे संपूर्ण ब्रह्मांड जल, वायू, पृथ्वी, तेज आणि आकाश या पाच तत्त्वांनी बनले आहे. या संसारात जेवढे जीव आहेत त्याचे शरीर याच पाच तत्त्वांनी बनले आहे. या पृथ्वीवर प्रत्येक जिवामध्ये गायत्री प्राण-शक्ती स्वरुपात विद्यमान आहे. याच कारणामुळे गायत्रीला सर्व शक्तींचा आधार मानले गेले आहे. यामुळे भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती दररोज गायत्री देवीची उपासना अवश्य करतो.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, गायत्री मंत्राचा अर्थ...
बातम्या आणखी आहेत...