शास्त्रानुसार निराकार रूप शिवलिंगाची उपासना व दर्शन इच्छापूर्तीचा अचूक उपाय आहे. तुम्हाला जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या शिव मंत्र स्तुतीने महादेवाची उपासना करा.ही शिव स्तुती 'लिगांष्टक' रुपात प्रसिद्ध आहे. शास्त्रानुसार सोमवारी किंवा प्रदोष तिथीला, शिव चतुर्दशी, सोमवती अमावास्येच्या रात्री या शिव स्तुतीचे स्मरण केल्यास लाभ होतो असे मानले जाते.
महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा. त्यानंतर दुधाने अभिषेक करून गंध, अक्षता बिल्वपत्र अर्पण करा. पूजा झाल्यानंतर पुढील स्लाईडमध्ये सांगण्यात आलेल्या शिव स्तुतीचे स्मरण करा...