आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे पडली होती सतीची जीभ, अग्नीला देवी मानून केली जाते पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवीच्या अद्भुत शक्तीचा महिमा सर्वांनाच माहिती आहे. यामुळेच देवीचे भक्त तन, मन, धनाने देवीची उपासना करतात. अशाच एका चमत्कारिक देवीचे मंदिर हिमाचल प्रदेशात आहे. 51 शक्तिपीठांमध्ये गणल्या जाणार्‍या या मंदिराला ज्वालामुखी देवी मंदिर स्वरुपात ओळखले जाते. या ठिकाणी देवी सतीची जीभ पडली होती असे मानले जाते.
मंदिराच्या गाभार्‍यात जमिनीतून माशालीसारखी एक ज्योत निघते. या ज्योतीलाच देवी मानून पूजा केली जाते. मंदिराच्या मागील बाजूस एक छोट्या मंदिरात कुंड आहे. या मंदिराच्या भिंतीमधून दोन प्रकाश-पुंज निघतात. जवळच असलेल्या दुसर्‍या कुंडात पाणी आहे. याला लोक गोरखनाथांचा कुंड म्हणतात. या परिसरात इतरही छोटी-छोटी मंदिरे आहेत. नवरात्रीमध्ये येथे मोठी जत्रा भरते. येथून काही अंतरावर अर्जुनदेवीचे मंदिर आहे.

कसे पोहोचाल - उत्तर रेल्वे विभागाचा एक मार्ग अमृतसरपासून पठाणकोटपर्यंत जातो. पठाणकोटपासून एक रेल्वे लाईन वैजनाथ पपरोलापर्यंत जाते. याच मार्गावर ज्वालामुखी स्टेशन आहे. स्टेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर एका पर्वतावर ज्वालामुखी मंदिर स्थित आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत बससेवा उपलब्ध आहे.

ज्वालादेवी मंदिराची इतर छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....