आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goddess Sita Saw The King Dasaratha In The Brahmins

श्राद्ध : जेव्हा ब्राह्मणांमध्ये राजा दशरथाला देवी सीतेने पाहिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्राद्ध पक्ष सुरु आहे. श्राद्ध पक्षामध्ये ब्राह्मणांना बोलावून त्यांना भोजन देण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, ब्राह्मणांनी केलेले भोजन आपल्या पितरांना प्राप्त होते. अशाच एका कथेचे वर्णन पद्म पुराणात आढळून येते, त्यानुसार...
जेव्हा भगवान श्रीराम वनवासात होते, तेव्हा श्राद्ध पक्षामध्ये त्यांनी वडील महाराज दशरथ यांचे श्राद्ध केले. देवी सीतेने स्वतः सर्व तयारी केली परंतु जेव्हा निमंत्रित ब्राह्मण भोजन करण्यासाठी आले तेव्हा देवी सीता कुटीमध्ये निघून गेल्या.
ब्राह्मण भोजन करून गेल्यानंतर श्रीरामाने देवी सीतेला याचे कारण विचारले, तेव्हा सीतेने सांगितले की...
पिता तव मया दृष्यो ब्राह्मणंगेषु राघव।
दृष्टवा त्रपान्विता चाहमपक्रान्ता तवान्तिकात्।।
याहं राज्ञा पुरा दृष्टा सर्वालंकारभूषिता।
सा स्वेदमलदिग्धांगी कथं पश्यामि भूमिपम्।।
(पद्म पुराण सृष्टि 33/74/110)

अर्थ - हे राघव! निमंत्रित ब्राह्मणांच्या स्वरुपात मी तुमच्या वडिलांचे दर्शन घेतले. यामुळे लज्जित होऊन मी तुमच्यापासून दूर गेले. तुमच्या वडिलांनी मला यापूर्वी सर्व दागिने आणि आभूषणांनी सुसज्जित पहिले आहे, आता ते मला अशा अवस्थेमध्ये कसे पाहू शकतील.