आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर, सोन्याने मढवलेले आहेत याचे खांब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांची स्वतःची अशी विशेष ओळख आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत तिरुपती व्यंकटेश्वर (बालाजी) मंदिराची माहिती देत आहोत. हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित आहे.

प्रभू व्यंकटेश्वराला भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. शास्त्रानुसार, भगवान विष्णूंनी काहीकाळ स्वामी पुष्करणी तलावाजवळ वास्तव्य केले होते. हा तलाव तिरुमलाजवळ स्थित आहे.

तिरुमलाला तिरुपतीच्या चारही बाजूंनी असलेले सात डोंगर, शेषनागाच्या सात फन्यांवर आधारित 'सप्तगिरी' पर्वत असेही संबोधले जाते. या पर्वत रांगांमध्ये स्थित बालाजीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. जवळपास सात फुट उंच देवाची मूर्ती श्याम वर्ण आहे. बालाजीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म स्थित आहे. देवाच्या दोन्ही बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या प्रतिमा आहेत.

सर्वात श्रीमंत मंदिर
तिरुपती बालाजीच्या मंदिरात दररोज 50,000 भक्त दर्शनासाठी येतात. भक्तांनी केलेले दान कोटींच्या घरात असते. प्रत्येक वर्षात या मंदिरात दान स्वरुपात अब्जो रुपये जमा होतात. या मंदिराचे खांब सोन्याने मढवलेले आहेत. यामुळे या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते.

तिरुपती बालाजी मंदिराची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...