कुंभमध्ये स्नान करण्यासाठी लोकांसोबत हजारो साधूसुद्धा एकत्र येतात. अनेक साधूंची एक विशिष्ठ वेशभूषा आणि स्टाइलही असते. हरिद्वार येथे सुरु असलेल्या अर्धकुंभमध्ये डुबकी लावण्यासाठी एक गोल्डन बाबासुद्धा आपल्या शिष्यांसोबत दाखल झाले आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे बाबा 15 किलो सोन्याचे दागिने घालून फिरतात. या दागिन्यांची किंमत जवळपास 3 कोटी आहे.
कोणकोणते दागिने धारण करतात गोल्डन बाबा...
- अर्धकुंभमध्ये गोल्डन बाबा सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन आहेत
- बाबा हातामध्ये जड गोल्डन ब्रेसलेट, मोठमोठ्या अंगठ्या, चेन आणि लॉकेट घालतात.
- या बाबांच्या हातामधील सोन्याची घड्याळ 27 लाख रुपयांची आहे
- बाबा एवढे दागिने का घालतात असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या शिष्याने सांगितले की, सोने खास असते आणि त्याचे एक विशेष महत्त्व आहे. सोन्याचे दागिने धारण केल्यामुळे आमचे गुरुही खास होतात.
कोण आहेत गोल्डन बाबा?
- 53 वर्षीय गोल्डन बाबाचे खरे नाव सुधीर कुमार मक्कड आहे.
- सन्यास घेण्यापूर्वी दिल्लीमध्ये यांचा कपड्यांचा व्यवसाय होता.
- सर्वकाही सोडण्याचा प्रश्नावर सुधीर म्हणतात, "मी खूप चुका केल्या आहेत, व्यवसाय क्षेत्रात असताना खूप चुकीची कामे केली आहेत."
-" मी सर्वकाही सोडून आता संन्यासी झालो आहे आणि यापुढे केवळ लोकांची मदत करणे हा माझा उद्येश्य आहे. विशेषतः गरिबीमुळे लग्न होत नसलेल्या लोकांची मी मदत करतो."
पुढील स्लाईडसवर क्लिक करून पाहा, गोल्डन बाबाचे काही खास फोटो...