आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपाष्टमी आज : या दिवशी करा गाईची पूजा, वाढेल सौभाग्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला गोपाष्टमी मोहोत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 19 नोव्हेंबर, गुरुवारी आहे. मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण केला होता. आठव्या दिवशी इंद्रदेव अहंकाररहित श्रीकृष्णाला शरण आले आणि क्षमायाचना केली. तेव्हापासून कार्तिक शुक्ल अष्टमीला गोपाष्टमी उत्सव साजरा केला जातो.

अशाप्रकारे साजरा करा उत्सव
सकाळी लवकर उठून गाईला स्नान घाला. गंध, फुल अर्पण करून गाईची पूजा करा. गवळी लोकांना भेटवस्तू देऊन त्यांचेही पूजन करा. गाईला सजवून गोड पदार्थ खाऊ घाला. प्रदक्षिणा घालून त्यांच्यासोबत थोडे अंतर चालून या. संध्याकाळी गाय चरून परत आल्यानंतर पुन्हा पंचोपचार पूजा करा. अशाप्रकारे पूजा केल्यानंतर गाईच्या पायाखालची माती कपाळावर लावा. असे केल्याने सौभाग्य वृद्धी होते.