Home | Jeevan Mantra | Dharm | Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says

PHOTOS : आईच्या गर्भात कोणता विचार करते मुल आणि काय म्हणते देवाला?

धर्म डेस्क | Update - Jan 08, 2014, 02:17 PM IST

कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात ती आई बनते तो क्षण सर्वात आंनदाचा असतो.

 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात ती आई बनते तो क्षण सर्वात आंनदाचा असतो.आईच्या गर्भात नऊ महिने मुल वाढते.
  वैद्यकीय शास्त्रानुसार आई जे काही अन्न खाते त्याचा काही भाग बाळाला मिळत असतो. हीच गोष्ट हिंदू ग्रंथातही
  सांगितली आहे. गरूड पुराणानुसार, आईच्या गर्भात येण्यापासुन मुल जन्माला येईपर्यंतच्या सर्व गोष्टीं स्पष्टीकरण केललेल्या आहेत.
  गरूड पुराणात भगवान विष्णूने त्याचे वाहन असण-या गरूडाला जिवन- मृत्यु, स्वर्ग, नरक, पाप-पुण्य, मोक्ष मिळवण्याचे उपाय या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. आईच्या गर्भात असताना बाळाला काय दुख: असतात आणि ते कशा पद्धतीने देवाला प्रार्थना करते, त्याच्या मनात काय काय विचार येतात हे देखील गरूड पुराणात सांगितले आहे.
  आईच्या गर्भात मुल काय विचार करते आणि देवाला काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  गरूड पुराणानुसार स्त्रीयांना येणा-या मासिक पाळीमुळे मुल जन्माला येते. यामुळेच त्या तिन दिवसात स्त्री अपवित्र असते असे मानल्या जाते. या तिन दिवसात नरकातील जिव जन्माला येतात. देवाच्या शक्तिने आत्मा आईच्या गर्भाशयात येतो.
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  एक रात्रीचे अर्भक सुक्ष्म कणासारखे, पाच रात्रीचे पाण्याच्या बुडबुड्यासारखे तर दहा दिवसाचे बोराच्या अकाराचे असते.त्यानंतर ते वाढुन अंडयासारखे दिसते. 
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  पहिल्या महिन्यात डोके तर दुस-या महिन्यात हात आणि इतर अवयव तयार होतात. तिस-या  महिन्यात नखे, हाडे, लिंग, चेहरा हे अवयव तयार होतात. चौथ्या महिन्यात त्वचा, रक्त, मज्जारजू तयार होतात. पाचव्या महिन्यापासून बाळाला भुक लागते. सहाव्या महिन्यात मुल आईच्या गर्भात फिरायला लागते
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  आईने खाल्लेले अन्न शोषून वाढत आसते. या काळात मुल जेथे विष्टा, मुत्राची निर्मीती होते आणि जेथे कित्येक जीवाणू असतात अशा ठिकाणी झोपत असते. आईच्या शरीरीतील ते जीवाणू त्याला चावा असतात. अशात मुल बेशुद्धही होते. 
  आई जे कडू, तिखट, कोरडे, आंबट अन्न खाते त्याने बाळाच्या नाजूक शरिराला खुप त्रास होत असतो.
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  यानंतर बाळ उलटे होते. त्याचे डोके खालच्या बाजूला तर पाय वरच्या बाजूला जातात. ज्याप्रमाणे पक्षी पिंज-यात राहतो त्याचप्रमाणे मुल आईच्या गर्भात दुखी असते. येथे सात धातूने बांधले गेलेले मुल घाबरून त्याला गर्भात पाठवणा-या देवाची स्तुती करत असते.
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  सातव्या महिन्यात अर्भक विचार करायला लागते, की मी गर्भातून बाहेर पडल्यानंतर मी ईश्वराला विसरून जाईल.या विचाराने दुखी होऊन मुल फिरत असते. सातव्या महिन्यात मुल देवाला म्हणते, की लक्ष्मीचा पती, जगाचा उद्दार करणारा, जगाचे पालन करणा-या, आणि तुला शरण येणा-या प्रत्येकाचे पालन करणा-या भगवान विष्णूला शरण जातो.
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says

  गर्भात मुल देवाला म्हणते, की माझ्या मोहामुळे मला हे जीवन प्राप्त झाले आहे. मी कुटूबांसाठी खुप काम केले पण आज मला एकट्यालाच त्रास सहन करावा लागत आहे. योनीच्या बाहेर आल्यानंतर मी तुझ्या चरणी अशी प्रर्थना करेल , ज्याने या कष्टातून मला मुक्ती मिळू शकेल.

 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  या नंतर मुल म्हणते, की हे भगवान मी येथे विष्टा आणि मुत्राच्यी विहरीत खुप दुखी आहे. मला तू येथून कधी बाहेर 
  काढशील? सर्वांवर दया  करणा-या ईश्वराने मला ज्ञान दिले आहे. मी तुला शरण आलो आहे त्यामुळे मला या नंतर 
  जन्म -मृत्यू च्या चक्रातून मला मुक्त कर.
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  गरूड पुराणानुसार बाळ म्हणते, की देवा मला आईच्या गर्भातून बाहेर काढू नकोस कारण येथून बाहेर पडल्यानंतर मला पाप करावे लागेल आणि मला पुन्हा एकदा नरकात याव लागेल. यामुळेच मला दुख: होत आहे. पण मी तुझ्या चरणाची सेवा करून आत्माचा उद्धार करेल.
 • Granth- Know What The Baby Thinks In The Mother Womb, What God Says
  या प्रकारे देवाची स्तती करत मुल जन्माला येते. प्रसतुतीनंतर बाळ हवेतुन श्वास घ्यायला सुरवात करते आणि ते सर्व 
  गोष्टी विसरते. त्याला कसलेही ज्ञान राहत नाही. म्हणुन बाळ जन्माला आल्यानंतर रडते.

Trending